झुंडींची झुंज आणि जात-धर्माच्या बेगडी अस्मिता!
खरं तर शिक्षणानं माणसाच्या विचारांची कुंपणं अधिक खुली व्हायला हवी, मनं मोठी होऊन संवेदना जागृत व्हायला हव्यात. पण काहीतरी विपरीतच होतंय. शिक्षणानं वैचारिक ब्लॉकेज खुलण्याऐवजी आम्ही वेगवेगळ्या अस्मितेच्या नावाखाली स्वतःला अधिकच जखडून घेतो आहोत. भोवतालची कुंपणं शिथिल करायची सोडून ती अधिक करकचून बांधून घेतो आहोत आणि एवढे कमी की काय त्याचा अभिमानही बाळगत हिंडतो आहोत.......